Tuesday, 3 March 2015

नाशिकचे जागतिकीकरण




       कारखान्यांतून बाहेर पडणारे विविध दूषित वायू व वाहितमल तसेच यंत्रांचे मोठे आवाज ही प्रमुख औद्योगिक प्रदूषके आहेत. कारखान्यांच्या धुराड्यातून कार्बन डाय-ऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड यांसारखे अपायकारक वायू वातावरणात सोडले जातात. त्यामुळे हवेचे प्रदूषण होते. अशी दूषित हवा सजीव सृष्टीला अपायकारक ठरते. कारखान्यांतील उत्सर्जित वायू व उष्णता यांमुळे वातावरणाचे तापमान वाढते. कारखान्यांतून बाहेर पडणार्‍या विविध प्रकारच्या आम्लांमुळे आम्लवर्षण होते. आम्लवर्षणामुळे वनस्पती, प्राणी, मृदा, पिके, ऐतिहासिक वास्तू किंवा शिल्पे यांच्यावर दुष्परिणाम होतात. उद्योगांमध्ये वापरण्यात येणार्‍या क्लोरोफ्लुओरोकार्बनमुळे उच्च वातावरणस्तरातील ओझोन थराचा क्षय होत आहे. औद्योगिक प्रदूषणांमुळे हरितगृह परिणाम ( सूर्याकडून आलेली उष्णता पृथ्वीवरील वातावरणात स्थानबंधन झाल्यामुळे होणारा परिणाम) जाणवू लागले आहेत.कारखान्यांतील वाहितमल नद्या, नाले, सरोवरे, खाड्या, समुद्र इ. जलाशयांत सोडल्याने त्यातील पाणी प्रदूषित होते. प्रदूषित पाणी मानवी आरोग्यास तसेच परिसंस्थांना अपायकारक ठऱते. गंगा नदीच्या काठावर उभारण्यात आलेले कारखाने व त्यामुळे निर्माण झालेली नागरी केंद्रे यांमुळ गंगा नदीचे पाणी खूप दूषित झाले आहे. जगातील तेलशुद्धीकरण कारखाने प्रामुख्याने समुद्रकिनार्‍यावर स्थापन झालेले 








नाशिकमधील वाढते प्रदूषण
       मुंबई, पुणे या शहरानंतर आता नाशिकसारख्या झपाटयाने विकसीतत होणा-या शहरालाही प्रदूषणाने वेढले आहे.यात प्रामुख्यांने वाहनांतून निघणा-या धूरामुळे होणारे प्रदूषण आणि गोदावरीचे प्रदूषण आहे प्रदूषणाला रोखण्यासाठी माञ कोणत्याही प्रकारचे भरीव प्रयत्ना होतांना दिसत नाही हे दूदर्वे !

       प्रदूषणाला आळा घालण्यासाठी शासकीस स्तरावून इको फ्रेंडली असणा-या वेगवेगळया कन्सेपटचा वापर करण्यावर भर देणे गरजेचे आहे. त्यासाठी वेगवेगळया योजना आखण्यात याव्या वैयवितक स्‍वच्‍छतेबरोबर सार्वजनिक स्‍वच्‍छतेला महत्वै देणे गरजेचे बनले आहे प्रदूषण कमी करून पर्यावरण संवर्धनाकडे अधिक लक्ष दिले गेले पाहिजे असे मला वाटते स्वयंसेवी संस्था बरोबरोच शासकीय तसेच निमशासकीय स्तरावरून समाजात




सार्वजनिक अस्‍वच्‍छता प्रदूषणाला हानीकारक
       मला नेहमी एक प्रश्‍न पडतो की माणुस जेवढी व्‍यव्‍तीगत स्‍वच्‍छतेची काळजी घेतो
त्‍याच्‍या कित्‍येक पटीने सार्वजनिक स्‍वच्‍छता महत्‍वाची असते. परंतु तरीही प्रत्‍येक जण
       त्‍याकडे जाणिव पूर्वक दूर्लक्ष करतांना दिसतात. वाढत्‍या प्रदूषणाला फवत वायूप्रदूषण तसेच
जल प्रदूषणच जबाबदार नसून त्‍याला मानवनिर्मित सार्वजनिक अस्‍वच्‍छताही तितकीच जबाबदार आहे
       याची सुरूवात ग्रहीणींपासून होते महिला घरातील कचरा घंटागाडीत न टाकता रस्‍त्‍यांच्‍या दूतर्फा टाकतात
त्‍यामुळे प्रदूषण तर होतेच पण सार्वजनिक आरोग्‍यही धोवयात येते त्‍यामुळे डासांची निर्मिती होउन रोगराइचा

अस्‍वच्‍छता निर्माण करून प्रदूषण वाढ करणा-यांवर कठोर कार्रवाइ करण्‍यात यावी.

जलप्रदूषण गोदावरीचे-




       औद्योगीकरण आणि रसायनांमुळेच बहुतेक नद्या प्रदूषित झाल्याचा सर्वसाधारण समज असला, तरी गोदावरी नदीबाबत वास्तव वेगळेच आहे. करोडोंचे पापक्षालन करणाऱ्या गोदामातेचे ८२ टक्‍के जलप्रदूषण तिचा आशीर्वाद व पुण्य घ्यायला येणाऱ्या भाविकांमुळेच होते. औद्योगिक प्रदूषणाचा वाटा फक्‍त १८ टक्‍के आहे. स्वाभाविकच गोदामातेला जीवदान देण्याची जबाबदारीही तिच्यावर अपार श्रद्धा ठेवणाऱ्या नाशिककरांवरच येऊन पडते.

ध्वनीप्रदूषण

 

       मोठा आवाज म्हणजे ध्वनिप्रदुषन-ध्वनिप्रदुषनाणे चिडचिड वाढते.रक्तदाब वाढतो.ध्वनिप्रदुषनला कारणीभूत ठरणारे अनेक घटक आहे.त्यात सार्वजनिक उसतावांच्या वेळी मोठा आवाज निर्माण होणारे ढोल तसेच सौन्डचा वापर सर्रासपणे केल्याने ध्वनिप्रदुषननिर्माण होऊन जनतेला तसेच जेष्ट माणसाना वेगवेगळ्या प्रकारचे आजार जुडतात.याबरोबरच मोटारींचा आवाजही ध्वनिप्रदुषनात भर घालतो.ध्वनिप्रदुषनाला आळा घालण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाहिजे त्या प्रमाणात प्रयत्न होत नसल्याने त्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे.

नाशिकचे अंजनेरी हिल्स

        लोणावळा, खंडाळा, माथेरान या ठिकाणांपाठोपाठ आता नाशिकपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अंजनेरी परिसरावर अनेक विकसकांचे लक्ष केंद्रित झालेले आहे. विविध शिक्षण संस्था, फार्म हाऊस, वॉटर पार्क, रिसॉर्टस, हॉटेल्स या आणि अशा विविध बाबींनी हा परिसर नावारुपाला येत आहे. अंजनेरी हिल्स म्हणून झपाट्याने विकसीत होणाऱ्या या परिसरावर टाकलेला हा फोकस....



रिजनल पार्क झोन

       त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सुमारे हजार हेक्टरचा परिसर राज्य सरकारने रिजनल पार्क झोन म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे याठिकाणी अमर्याद विकास कामांवर निर्बंध आहेत. रिसॉर्ट, हॉटेल्स, करमणुकीशी निगडीत विविध बाबी यासारख्या बाबींना येथे चालना देण्यात आली आहे. डोंगर, वनराई आणि धार्मिक स्थळांनी बहरलेला हा परिसर पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. आता हा परिसर अंजनेरी हिल्स म्हणून नावारुपाला येणार आहे. 


 एज्युकेशन हब

       अंजनेरी परिसरात सध्या संदीप फाऊंडेशन, सपकाळ नॉलेज हब, ब्रह्मा व्हॅली या तीन शिक्षण संस्था कार्यरत आहेत. या तिन्ही संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रम नव्याने सुरु होणार आहेत. त्यामुळे या तिन्ही संस्थाचा विस्तार प्रस्तावित आहे. आगामी काही वर्षात या ठिकाणी इतरही शिक्षण संस्था येणार आहेत. नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था, विखे-पाटील शिक्षण संस्था यांनी या परिसरात जागा घेतली आहे. तर काही संस्था येथे जागेच्या शोधात आहेत. इंटरनॅशनल स्कूल्स, मॅनेजमेंट इंजिनीअरींग, फार्मसी यासारख्या इन्स्टिट्यूटमुळे हा परिसर एज्युकेशन हब म्हणून विकसीत होण्याचा मार्गावर आहे.

वेलनेस टुरिझम
       ठराविक आजारावर उपचार घेण्यासाठी भारतात, महाराष्ट्रात आणि नाशिक परिसरात येणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. याद्वारेच नाशकात मेडिकल टुरिझम वाढताना दिसत आहे. याच्याच जोडीला आता अंजनेरी परिसर वेलनेस टुरिझमद्वारे नावारुपाला येण्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. आजारी पडूच नये यासाठी घेण्यात येणाऱ्या विविध काळजी आणि खबरदारींचे मार्गदर्शन याठिकाणाहून मिळू शकेल. खासकरुन मेडिटेशन, योगा, आयुर्वेद अशा विविध बाबींना वाहिलेल्या संस्था या ठिकाणी सुरु होऊ शकणार आहेत. इगतपुरी येथे विपश्यना केंद्राच्या धर्तीवर असलेल्या या संस्थांमध्ये येणाऱ्यांना धार्मिक पर्यटनही करता येवू शकेल. तसेच, नाशकात वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर ताण घालविण्यासाठीचे केंद्रही याठिकाणी साकार होऊ शकतील. ज्या पद्धतीने उरळी कांचन, लोणावळा विकसीत झाले. त्याच धर्तीवर अंजनेरी हिल्स विकसीत होण्याचे संकेत दिले जात आहेत.

आयटी हब
       इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अर्थात आयटी उद्योग हा प्रदूषणविरहीत आहे. त्यामुळे नाशिकताली आयटी उद्योग या परिसरात बहरायला हवा, अशी अपेक्षा बागळगली जात आहे. मोठ्या आयटी कंपन्या त्यांचा उद्योग हिरवाच्छादित ठेवतात. तसेच, प्रदूषण कमी होईल यादृष्टीने तो विकसीत करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या उद्योगांना याठिकाणी चालना देण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील झाले आहेत.

फार्म हाऊस
       नाशकातील नामांकीत डॉक्टर्स, इंजिनिअर्स, आर्किटेक्ट, उद्योजक यांनी अंजनेरी परिसरात ६३ एकर क्षेत्रावर फार्म हाऊसची संकल्पना विकसीत करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार ३० फार्म हाऊस बांधून झाले आहेत. तर इतरांचे काम सुरु आहे. त्यामुळे हे फार्म हाऊस या परिसरात आकर्षणाचा विषय ठरु शकतील.

ट्रेकिंग सेंटर
       अंजनेरी येथे राज्यातील पहिले ट्रेकिंग इन्फॉर्मेशन सेंटर प्रस्तावित आहे. गिरीप्रेमींसाठी हे सेंटर  अत्यंत मोलाचे आहे. धाडसी खेळांच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूनेच हे सेंटर उभारले जाणार आहे. तीन एकरात उभारण्यात येणाऱ्या या सेंटरला पर्यटन विभागाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. सव्वा कोटी रुपये खर्चुन होणाऱ्या या सेंटरद्वारे विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

सायकल ट्रॅक
       नाशिकपासून त्र्यंबकपर्यंत चौपदरी रस्त्याला समांतर सायकल ट्रॅक करण्याचे प्रस्तिवात आहे. यामुळे सायकल आणि पर्यावरण प्रेमींसाठी ही सुखद बाब आहे. या ट्रॅकच्या रुपाने या मार्गाचे वेगळेपण दिसतानाच या परिसरातील वैभवात भरच पडणार आहे.

व्हल्चर रेस्टॉरंट
       निसर्गाचा सफाई कामगार म्हणून ओळख असलेल्या गिधाडांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी अंजनेरी येथील वनविभागाच्या जागेत व्हल्चर रेस्टॉरंट विकसीत करण्यात येणार आहे. साधारण एक एकर जागेवर तारेचे कुंपण घातले जाईल. म्हणजेच ही जागा गिधाडांसाठी राखीव  राहील. या जागेत परिसरातील मृत जनावरे टाकण्यात येतील. तत्पुर्वी मृत जनावरांच्या शरीरात डायक्लोफिनॅक औषधाचा अंश आहे की नाही याची खात्री पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केली जाईल. मृत जनावरे हेच गिधाडांचे खाद्य असते. या रेस्टॉरेंटच्या माध्यमातून ते गिधाडांना उपलब्ध होतानाच जनावरांच्या मृतदेहाची योग्यरितीने विल्हेवाट लावण्याचीही सुविधा उपलब्ध होईल. गिधाडे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने या रेस्टॉरंटद्वारे गिधाडांचे मोठ्या प्रमाणात संरक्षण होऊ शकेल.

कॉन्झर्वेशन रिझर्व्ह
       अंजनेरीचा परिसर हा आयुर्वेदिक आणि दुर्मिळ वनस्पतींसाठी नावाजलेला आहे. त्यामुळे या वनस्पतींच्या संवर्धनासाठी या भागात २०० एकर क्षेत्रावर कॉन्झर्वेशन रिझर्व्ह स्थापण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. या अभयारण्यांच्या धर्तीवर असलेल्या रिझर्व्हमुळे दशमुळारिष्ट, टेटू, मूरडशेंग, अश्वगंधा, कळलावी, सालवण, पिटवण, बेल, शिवण, कोरफड यासारख्या औषधी वनस्पतींचे मोठ्या प्रमाणात संरक्षण करताना त्यात वाढ करता येणार आहे. तसेच, राज्य आणि केंद्र सरकारकडून त्यास निधी उपलब्ध होऊ शकेल.

चौपदरी ग्रीन रस्ता 
       नाशिक ते त्र्यंबक हा साधारण तीस किलोमीटरचा रस्ता चौपदरी करण्याचे काम लवकरच सुरु होणार आहे. हा रस्ता ग्रीन आयडॉल करण्याचा निश्चय सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. या रस्त्याच्या कडेला सध्या असलेल्या शंभर ते सव्वाशे वृक्षांचे पुनर्रोपण आणि सद्यस्थितीत असलेल्या वृक्षांच्या बदल्यात झाडे लावण्यात येणार आहेत. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात रोपांची लागवड या रस्त्याचे महत्त्व वाढविणार आहे.

ब्रह्मगिरी फेरी
        श्रावणात ब्रह्मगिरी फेरीसाठी भाविकांसह युवकांची मोठी झुंबड उडते. त्यामुळे श्रावण सोमवारी अंजनेरीचा परिसरही बहरुन जातो. अंजनेरी हिल्स म्हणून हा परिसर विकसीत झाल्यानंतर येथे भाविक आणि युवकांची संख्या आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे.
        निसर्ग समृद्धीने नटलेल्या अंजनेरी परिसराचे महत्त्व मोठे आहे. प्रचंड क्षमता असूनही हा भाग तसा दुर्लक्षितच राहिला आहे. मात्र, आता हा परिसर अंजनेरी हिल्स म्हणून नावारुपाला आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. -शशी जाधव, संचालक, शुभम वॉटर पार्क
       नाशिक लगत असलेला अंजनेरी परिसर ग्रीन थीमद्वारे विकसीत होत आहे. याठिकाणी होणारा प्रत्येक प्रकल्प मोठ्या प्रमाणात रोपांची लागवड करीत आहेत. त्यामुळे या परिसराचे हिरवी समृद्धी कायम राहणार आहे. तसेच, या परिसरात येत्या काळात वेलनेस आणि होली टुरिझमलाही चालना मिळेल

Monday, 2 March 2015

पर्यटन



     भारतातील अलाहाबाद, उज्जैन, हरिद्वार व नाशिक येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. नाशिक येथे सिंहस्थ पर्वात भरणार्‍या कुंभमेळ्यामध्ये गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी श्रद्धाळू भाविक प्रचंड संख्येने गर्दी करतात. नाशिक जिल्ह्यात साजर्‍या होणार्‍या धार्मिक उत्सवांपैकी हा सर्वात महत्त्वाचा व भव्य धार्मिक उत्सव! हा उत्सव १२ वर्षांनी एकदा साजरा होतो. नाशिक कुंभमेळ्याला धार्मिक मेळाव्यांमध्ये सर्वात पवित्र मेळावा म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. हा केवळ जिल्ह्यापुरता उत्सव नसून राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध पावलेला उत्सव आहे.
     राक्षसांपासून अमृततीर्थाचे रक्षण करण्यासाठी सर्व देव पृथ्वीवर १२ दिवस वास्तव्य करून होते.  देवतांचे १२ दिवस म्हणजे मानवाची १२ वर्षे, आणि म्हणूनच सिंहस्थ कुंभमेळा १२ वर्षांनी साजरा केला जातो. ह्या अमृततीर्थाचे चार थेंब ज्या ठिकाणी पडले होते, अशा चार ठिकाणी हा मेळा भरतो. या मेळ्यात लाखोंनी भक्त सहभागी होतात.          
     डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेथे मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला होता, ते काळाराम मंदिर नाशिक येथेच असून येथील नारोशंकर मंदिर, कपालेश्वर मंदिर, पंचवटी, सीताकुंड, तपोवन ही स्थळे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत. येथून जवळच असलेली पांडव लेणीही प्रसिद्ध आहेत.
नाशिक-मुंबई  रस्त्यावर नव्याने निर्माण करण्यात आलेले बुध्द विहार बौध्द बांधवांचे श्रध्दास्थान आहे.
     त्र्यंबकेश्वर हे गोदावरी नदीचे उगम स्थान व बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाणारे हे ठिकाण असून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ज्योतिर्लिंगावर ब्रह्मा, विष्णू व महेश या तिन्ही देवांच्या प्रतिमा हे येथील शिवलिंगाचे वैशिष्ट्य आहे.हे मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी असून उत्कृष्ट शिल्प व स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध आहे.
      सप्तशृंग गड: कळवण तालुक्यातील वणी येथे देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्ध्या पीठाचे हे महत्त्वाचे स्थान आहे. सप्तशृंगी देवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप समजले जाते. सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत म्हणून या स्थानाचे नाव सप्तशृंग! हा गड १४१६ मी. उंच असून येथील परिसर अत्यंत रमणीय आहे.
     जिल्ह्यातील मालेगाव हे शहर मोसम नदीच्या किनार्‍यावर वसले असून पेशव्यांचे सरदार नारोशंकर यांनी बांधलेला भुईकोट किल्ला येथे आहे.
येवला येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपला धर्मांतराचा निर्णय जाहीर केला. तात्या टोपेंसारख्या स्वातंत्र्यसेनानीचे हे जन्मगाव होय. याशिवाय भगूर हे  स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थान नाशिक तालुक्यात आहे. नांदूर-मध्मेश्वर हे गोदावरी व कादवा या नद्यांच्या संगमाजवळ वसलेले  अभयारण्य  ‘महाराष्ट्राचे भरतपूर’ म्हणून ओळखले जाते. (भरतपूर हे राजस्थानमधील प्रसिद्ध अभयारण्य आहे.) १०,००० हेक्टरवर पसरलेल्या ह्या अभयारण्यात पक्ष्यांच्या २२० प्रजाती, वनस्पतींच्या ४०० प्रजाती व माश्यांच्या २४ प्रजाती आढळतात.                                         

     सिन्नर येथे श्री गोंदेश्वराचे प्राचीन हेमाडपंती देवालय आहे. तसेच येथील भैरवनाथ मंदिरात प्रचंड गणेशमूर्ती आहे. येथे देवीची बारा मंदिरे आहेत. याशिवाय येथे भारतातील पहिले खाजगी विमानतळही आहे.  उपरोक्त स्थानांबरोबरच नाशिक तालुक्यातील म्हसरुळ येथील जैन लेणी, सीमेवरील सापुतार्‍याचे जंगल, सोमेश्र्वर येथील दुग्धस्थळी धबधबा, चांदवड येथील किल्ला ही इतर पर्यटन स्थळे जिल्ह्यात आहेत.