Wednesday, 4 February 2015

नाशिक तपोभूमी आणि कर्मभूमी


           


प्रभू श्रीरामचन्द्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे “नाशिक” १४ वर्षाच्या वनवासाच्या काळात राम,लक्ष्मण आणि सीतामाता गोदाकाठी पंचवटी पर्णकुटीमध्ये त्यांनी निवास केला होता. पृथ्वीतालावरील हिंदू धर्मियांचा सर्वाधिक पवित्र शहरात नाशिकचे सर्वोच्च स्थान आहे.कारण येथे होणारा “सिंहस्थ कुंभमेळा “ प्रत्येक बारा वर्षानंतर एकदा नाशिक य शहरात भरतो . जेंव्हा सुर्य सिंह राशीत प्रवेश करतो.


    


 

    भारतभर दशक्रियेसाठी काशी आणि नाशिकचे महत्व अहंमान्य आहे. त्र्यंबकेश्वर बारा ज्योतिर्लिंगपैकी नाशिकपासून फक्त तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे. तेथूनच उगम पावणारी गोदावरी नदी य ठिकाणी आहे.तसेच य नदीला दक्षिणगंगा या नावाने प्रसिद्ध आहे. व रामकुंड हे पवित्र तीर्थ या नदीवर आहे. येथे असलेले शंकर भगवानाचे मंदिर असून त्या मंदिरात शंकर भगवानाचे वाहन नंदी या मंदिरात नसून असे एकमेव मंदिर आपल्या भारतात म्हणजे नाशिक या शहरात आहे.

    

     एकीकडे तपोभूमीचे सामर्थ्य पाहता नाशिकचे तांत्रिकदृष्ट्या प्रगती विसरून चालणार नाही.भारतातील चलनी नोटांचा कारखाना [ नोट प्रेस ] नाशिक शहरात आहे. तसेच शहरापासून वीस किलोमीटर अंतर असलेले ओझर या ठिकाणी लढाऊ विमान कारखाना [H.A.L], तसेच भारतातील क्रमांक एक व आशिया खंडातील क्रमांक दोनचा सर्वाधिक ५.०३ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल नाशिक शहरातून जातो.

    

      जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये आपल्या नाशिक शहराचा १६वा क्रमांक लागतो. शहराची लोकसंख्या २०लखाहुन अधिक आहे. हि लोकसंख्या २७० कि.मी. अंतराच्या परिघात वसलेली आहे. शहरातून जाणारा सहापदरी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग [N.H.] क्रं.०३ आता एशियाटिक हायवे नं.४७ हि बनला आहे.  तसेच ओझर येथे विमानतळ प्रकल्प चालू आहे. गंगापूर धरणावर होणारा [fiying sea plane ] प्रकल्पाचे काम करण्याचे सरकार प्रयत्न सरकार करत आहे. अंबड,सातपूर आणि सिन्नर येथिल माळेगाव सारख्या MIDC नाशिकच्या प्रगतीत मोलाचा वाटा आहे . 

   

     भारताचे वाईन राजधानी म्हणून आपल्या नाशिकची ओळख निर्माण झाली आहे.७५ वाईनरी नाशिक शहरात आहे म्हणूनच नाशिक शहराला जगाच्या नकाशावर वेगळे स्थान निर्माण प्राप्त झाले. उत्तम प्रतीचे द्राक्ष निर्यात करणारे शहर आहे. बारमाही थंड तापमान नाशिकमध्ये आल्हादायी असते. जून महिन्यापासून डिसें-जानेवारी पर्यंत पंधराहून अधिक गडकिल्ले भटकंतीला जसे जनी खुणावतात.


   

  

 

 

    हिंदू प्रमाणेच मुस्लीम , ख्रिश्चन ,शीख  इ. धर्मांचे लोक व त्यांची संस्कृती आपल्याला य शहरात दिसून येते. हे सर्व धर्मीय एकोप्याने वावरताना दिसतात तसेच एकमेकांच्या सणावारात आनंदाने सहभागी होताना आढळतील.



No comments:

Post a Comment