Friday, 13 February 2015

ऐतिहासिक पार्श्वभूमी

नाशिक शहर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून नाशिक जिल्ह्याकडे पाहिले जाते.सर्वच क्षेत्रात आघाडीवर नाशिक जील्ह्याकडे बघितले जाते.मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामर्गापासून जवळच एक महत्वाचे श्रद्धास्थान म्हणून, शिर्डीसारख्या क्षेत्राचे सान्निध्य,तीर्थक्षेत्र म्हणून परिचित असलेले नाशिक-त्र्यंबकचे महात्म्य यामुळे वर्षभर येथे भाविकांची तसेच पर्यटकांची वर्दळ नेहमीच आपल्या दिसेल.या ठिकाणचे हवामान हे आरोग्यास उत्तम प्रतीचे आहे.पर्यटक या ठिकाणी हवापालटीसाठी नाशिकला राहायला येत असतात.

नाशिक शहर गोदावरी नदी काठी वसलेले असून, या ठिकाणी पेशव्यांची सत्ता होती त्यावेळेस त्यांनी नाशिक शहरात घात,मंदिरे उभारून नाशिक शहराला आकार देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.त्यात पेशव्यांच्या सरदारांनी बांधलेले श्रीकाळाराम मंदिर हे जगप्रसिद्ध आहे तसेच नुकतेच पी.के. चित्रपटाचे चित्रीकरण याठिकाणी झाले.तसेच याच मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा, या मागणीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक सत्याग्रह केला होता. पंचवटी परिसरात नारोशंकर मंदिर, कपालेश्वर मंदिर,तपोवन, नाशिक रोड येथे मुक्तिधाम हि स्थळे आहेत. तसेच दर बारा वर्षांनी रामकुंडावर सिंहस्थ महाकुंभमेळा या ठिकाणी भरतो.
    शहरा जवळच आनंदवल्ली हे ठिकाण आहे.या गावचे मूळ नाव चावड. या गावात राघोबादादांनी त्यांची पत्नी आनंदीबाई हिच्यासाठी राजवाडा बांधला होता.तसेच यागावचे नावहि आनंदवल्ली ठेवले.

नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर अंजनेरी हे गाव आहे. हे गाव इतिहासप्रसिद्ध तर आहेच, परंतु हनुमानाचा जन्म या अंजनेरीच्या डोंगरावर झाल्याची आख्यायिका असल्याने येथे हनुमान जयंतीला मोठी यात्रा भरते. इ.स.७२० मधील दोन ताम्रपट व तेराव्या शतकातील दोन ताम्रपट या गावात सापडल्याने या गावाचे महत्व अधिकच स्पष्ट झाले. त्याकाळची राजधानी म्हणून अंजनेरी हे होते.

नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य आभियांत्रिकी व संशोधन संस्था, महाराष्ट्र पोलीस अकादमी आहे. एकलहरे या ठिकाणी औष्णिक  विद्युत केंद्र आहे,तर भगूर हे गाव स्वांतत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. 

त्र्यंबकेश्वर हे ठिकाण नाशिक शहरापासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. याच परिसरात कुशावर्त तीर्थ असून, येथेही बारा वर्षांनी नाशिकबरोबरच शैव पंथीय साधू-महंताचा कुंभमेळा भरतो. येथे असलेल्या ब्रह्मगिरी डोंगरातून गोदावरीचा उगम झालाय. याच गावात निवृत्तीनाथांनी समाधी घेतली असून, दरवर्षी येथे मोठी यात्रा भरते.

चांदवड हे तालुक्याचे ठिकाण असून, येथे लोकमता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे निवासस्थान होते. येथे ११व्या शतकातील जैन लेणी आहेत. होळकरांचा भव्य वाडा आणि वाड्यातील रंगीत चित्रे पाहाण्यासारखी आहेत. चांदवडमधील रेणुकादेवीचे मंदिर प्रसिध्द आहे.

कळवण तालुक्यातील सप्तशृंग गडावरील सप्तशृंगी निवासिनीचे मंदिर आहे. देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक म्हणून हे स्थान प्रसिध्द आहे इगतपुरी येथील विपश्यना केंद्र प्रसिध्द आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणूनही हे प्रसिध्द आहे.
नाशिक शहर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून नाशिक जिल्ह्याकडे पाहिले जाते.सर्वच क्षेत्रात आघाडीवर नाशिक जील्ह्याकडे बघितले जाते.मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामर्गापासून जवळच एक महत्वाचे श्रद्धास्थान म्हणून, शिर्डीसारख्या क्षेत्राचे सान्निध्य,तीर्थक्षेत्र म्हणून परिचित असलेले नाशिक-त्र्यंबकचे महात्म्य यामुळे वर्षभर येथे भाविकांची तसेच पर्यटकांची वर्दळ नेहमीच आपल्या दिसेल.या ठिकाणचे हवामान हे आरोग्यास उत्तम प्रतीचे आहे.पर्यटक या ठिकाणी हवापालटीसाठी नाशिकला राहायला येत असतात.

No comments:

Post a Comment